सावली:- येथील युवा व्यापारी धीरज ऊर्फ बबली नंदकिशोर सारडा वय 25 वर्ष यांचे आकस्मित निधन झाले.त्याचा निधनाचे वृत्त सावली शहरात पसरताच सर्वत्र शोककळा पसरली. दिनांक 12 डिसेंबर ला आपला वाढदिवसाच्या साजरा करून 25 वर्षात पदार्पण केलेला हा तरुण लोकप्रिय होता. त्यांचे वडील हे कापड व्यापारी असून हा धान व्यापारी होता.तसेच माताराणी शारदा मंडळ चा क्रियाशील सभासद होता. काल दिनांक 28 ला पहाटे अचानक पोटदुखी उमळली होती. त्याला चंद्रपुर येथे उपचार साठी नेण्यात आले. मात्र प्रकृती खालावत असल्याने त्याला नागपूर येथे भरती करण्यासाठी नेत असतांना त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यूची बातमी सावली करांना धक्कादायक ठरली आहे. त्याचा मागे मोठे वडील , मोठी आई, वडील, आई, भाऊ, बहीण तसेच मोठा आप्तपरीवार आहे.