ग्रामस्थांशी चर्चा व विकास कामांची पाहणी.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- तालुक्यातील बिबी येथील ग्रामस्थांनी राज्यात आदर्श व जिल्ह्यात स्मार्ट ठरलेल्या घाटकुळ येथे अभ्यास दौरा निमित्त भेट दिली. घाटकुळ गावाची यशोगाथा व माहीती जाणून घेतली. लोकसहभागातून झालेल्या विकास कामांची पाहणी केली. घाटकुळ येथील ग्रामस्थांनी बिबी येथील ग्रामस्थांचे स्वागत केले. अभ्यास दौर्यात कोरपना पं.स.सदस्य सविता काळे, संतोष उपरे, चंद्रशेखर चटप, हबीब शेख, स्वप्निल झुरमुरे, राजेश खनके, सुनिल भोयर, सुनिल जांभूळकर, प्रभाकर भगत, बंडु आडकिने, विजय हंसकर, शांताराम टोंगे, जया कापटे, पूजा खोके, माया खाडे, सुनिता पावडे, अर्चना ढवस, कुंदा चटप, नंदा भगत, सुमन भगत, माया कापटे, शुभांगी हंसकर, फर्जाना शेख, अनिता धोंगडे, सुनिता आडकिने, अनिता भोयर, वर्षा सिडाम, जेणेकर, विद्या झुरमुरे यासह ४९ नागरिकांचा सहभाग होता.
पं.स.सदस्य सविता काळे म्हणाल्या, घाटकुळ गावाने लोकसहभागातून केलेली कामे कौतुकास्पद आहे. मेहनत घेणाऱ्या सर्व गावकऱ्यामुळे गावाचे नाव जिल्हा व राज्यात नावलौकिक झाले आहे. गावाचा झालेला कायापालट व बघितलेला लोकसहभाग प्रेरणादायी आहे. आमच्या बिबी गावातील अविनाश पोईनकर ग्रामपरिवर्तक म्हणून या गावात कार्यरत होते, याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी घाटकुळच्या माजी सरपंच प्रीती मेदाळे, बाल पंचायतीच्या सरपंच काजल राळेगावकर, जनहित व मराठा युवक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. विशेषता बिबी देखील स्मार्ट ग्राम असून एका स्मार्ट गावाचा दुसऱ्या स्मार्ट गावात अभ्यास दौरा होणे हे आनंददायी असल्याचे मत घाटकुळ येथील ग्रामस्थांनी व्यक्त केले. संचालन राम चौधरी यांनी केले.