घुग्घुस शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध:- देवराव भोंगळे
चंद्रपूर:- घुग्घुस येथील ग्रामपंचायत आठवडी बाजार परिसरात पेवर ब्लाकचे, तलाव रस्त्याचे आधुनिकीकरण, नाली बांधकाम, वाल कंपाऊंड व शौचालयाचे काम सुरू आहे.
भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या सहकार्यातुन माजी सरपंच संतोष नुने यांच्या कार्यकाळात जिल्हापरिषदेतुन पेवर ब्लाक साठी 10 लाख व शौचालय तलाव रस्ता आधुनिकीकरणा साठी 25 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
घुग्घुस ग्रामपंचायत परिसरात हि विकास कामे सुरू आहे या विकास कामांची भाजपा युवामोर्चा जिल्हामहामंत्री तथा भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे, पं.स.चे येनुरकर, कंत्राटदार झाडे, भाजपा नेते बबलु सातपुते, सतिश कामतवार यांनी पाहाणी करून विकास कामांचा आढावा घेतला.