महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.

Bhairav Diwase
नागवंश युथ फोर्सचा उपक्रम.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- विश्वरत्न बोधीसत्व महामानव डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून सेवानिवृत्त तलाठी सदाशिव संभाजी राऊत याच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
     बस स्टँड समोरील स्थानिक बुध्द विहारात दि. 6/12/2020 रोजी झालेल्या या भव्य रोगनिदान शिबिरात नागरिकांनी हिरहिरीने भाग घेतला. धानु उमरे यांच्या नेतृत्वात नागवंश युथ फोर्सच्या कार्यकर्त्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी असल्याचा संदेश दिला. या रक्तदान शिबिरात 56 बाटल्या रक्त गोळा करण्यात आले.
          राज्यात निर्माण झालेल्या रक्त तुटवता संदर्भात मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच केलेल्या आवाहनाला नागवंश युथ फोर्सच्या रक्तदान शिबिराचे प्रतिसाद देऊन रुग्णासाठी लागणाऱ्या रक्ताच्या मागणीत आपला खारीचा वाटा उचलून नागवंश फोरम सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याचे दाखवून दिले आहे.
              या रक्तदान शिबिराला ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एल. टी. कुलमेथे तसेच चंद्रपूर जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष वरिष्ठ पत्रकार डॉ. उमाकांत धोटे यांनी भेट देऊन नागवंश फोर्सच्या उपक्रमाची प्रशंसा केली.
                 चंद्रपूर जिल्हा रक्तपेढी येथून आलेल्या चमूने रक्त संकलनाचे कार्य केले. यामध्ये श्री.जय पचारे, सौ. वर्षा सोनटक्के, विशाल बानकर, देवेंद्र कुडवे यांचा समावेश होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धनराज उमरे, अमोल राऊत, जय खोब्रागडे, नूतन ब्राह्मणे, विजय कांबळे, आकाश नळे, रवी बावणे, रवी झाडे, उत्कर्ष गायकवाड, सुरेंद्र फुसाटे, राहुल अंबादे, निखिल वनकर, व इतर कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.