नायवाडा येथे छोट्या चिमुकलीचा जन्म वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- जिवती तालुक्यातील नायवाडा ईथे कु.सोनु संगदेव राठोड या चिमुकलीचा जन्म वाढदिवस अंगणवाडीत साजरा करण्यात आले. अंगणवाडी सेविका सौ मथुरा राठोड यांच्या उपस्थितीत हा जन्म वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी अंगणवाडी सेविका सौ मथुरा राठोड यांच्या कडुन काही भेट वस्तू देऊन सर्व गर्भवती महिलांना बालसंगोपना विषयावर आवश्यक ती माहिती दिली व काही पौष्टिक आहार देऊन आम्ही अस्या साद्या पद्धतीने मुलांचं वाढदिवस साजरा करुन होणाऱ्या प्रदुषणाला आळा घालुन शासनाला मदत करु असे मत व्यक्त केले या वेळी उपस्थित सोरेकसा ग्रामपंचायत ची उपसरपंच सौ.मीराताई राठोड, सौ चंद्रकला जाधव, रेणुका पवार, सुषमा राठोड, सखुबाई राठोड, रेणुका राठोड, अहील्याबाई राठोड, सामका राठोड, अनिता पवार, शांता राठोड, उज्वला पवार, शोभा जाधव, सुमण पवार, शांता जाधव, विमल पवार, संगीता पवार, सागुबाई राठोड, रेणुका राठोड, कुशाबाई जाधव, गिता राठोड, भुराबाई जाधव, मनिषा राठोड, सीताबाई राठोड, सुनिता राठोड, वनिता राठोड, चागोंनाबाई राठोड, शिवाजी पवार व सुनिल राठोड ई. मान्यवर उपस्थित होते