(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षातील सर्व सण, उत्सव साध्या पद्धीत साजरे करण्यात आले. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पोंभुर्णा तालुक्यातील गावागावात अभिवादन करण्यात आले.
पोंभुर्णा शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भारतीय बौद्ध महासभा शाखा पोंभूर्णा च्या वतीने अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष रघुनाथ उराडे, भारतीय बौद्ध महासभेचे सचिव जयपाल उराडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर भिमस्मरण करण्यात आले व दोन मिनिटे मौन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.कार्यकर्माला शहरातील असंख्य जनता उपस्थित होती.