चंद्रपूर जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण सोडत 29 जानेवारीला....

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Jan 26, 2021


चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका नुकत्याच पार पडल्या. मात्र सरपंच पदाच आरक्षण जाहीर झालेले नसल्याने या निवडणुकीत रंगत तर आलीच मात्र राजकीय पक्षाच्या दावेदारी वरून रस्सीखेच देखील पाहायला मिळाली. मात्र आता सरपंच पदाचं आरक्षण 29 जानेवारी 2021 रोजी दुपारी 2 वाजता चंद्रपुर जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यलयालात जाहीर करण्यात येणार आहे.


    राज्यात 2020 ते 2025 पर्यंत होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूकीचे सरपंच पदाचे आरक्षण 15 डिसेंबर 2020 रोजी जाहीर होणार होते. मात्र राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक व निकाल जाहीर झाल्यावर सरपंच पदाच आरक्षण जाहीर होईल, असा नवा आदेश आल्याने राज्यात 15 जानेवारीला ग्रामपंचायत निवडणूका पार पडल्या. या निवडणुकीचा निकाल 18 जानेवारी रोजी जाहीर झाला व राजकीय पक्षाची दावेदारी वरून रस्सीखेच सुरू झाली . यासाठी राजकीय पक्षानी नवनिर्वाचित सदस्यांवर करडी नजर ठेवत राजकीय गतीविधींना जोरदार सुरुवात केली आहे . त्यामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थावर कुणाचं वर्चस्व राहणार? हे लवकरच पाहायला मिळणार असल्याने सर्वत्र आरक्षणाची उत्सुकता वाढली असल्याचे दिसून येत आहे .