स्थानिक चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती "पराक्रम दिवस" म्हणून साजरी.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Jan 26, 2021
पोंभुर्णा:- स्थानिक चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा येथे दि. 23/01/2021 ला नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती "पराक्रम दिवस" म्हणून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. एच. पठाण होते. यावेळी प्राचार्य डॉ. एन. एच. पठाण यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जिवन चारित्र्यावर बोलताना म्हटले कि, भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात ज्या थोर वीरांनी कशाचीही पर्वा न करता उडी घेतली आणि अगदी निकराने लढा देत भारताला स्वतंत्र करण्यात मोलाची भूमिका बजावली, त्या थोर वीरांमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव आघाडीने घेतले जाते. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे भारत भूमीचा एक तळपता सूर्य होता.

नेताजींनी केलेलं कार्य आजही प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणारं, अन्यायाविरुद्ध हातात शस्त्र उठवायला लावणारं असं आहे. म्हणूनच इंग्रजांनी देखील नेताजी सुभाषचंद्र बोस यांची धास्ती घेतली होती.

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित प्रा. चौधरी सर, प्रा, उगेमुगे सर, प्रा. घोडेस्वार सर, प्रा. बावनकुळे सर, प्रा. गुडधे सर, प्रा. नरवाळे मॅम तसेच प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.