ढोरवासा केंद्राची सहविचार सभा संपन्न.

Bhairav Diwase
२७ पासून सुरु होणार ५ ते ८ चे वर्ग.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- तालुक्यातील ढोरवासा केंद्राचे केंद्रप्रमुख श्री भारतजी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 27 जानेवारी पासून सुरू होत असलेल्या वर्ग पाच ते आठवी शाळेच्या मुख्याध्यापक यांची सहविचार व शासन परिपत्रकाच्या सूचना बद्दल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गवराला येथे नुकतीच सभा घेण्यात आली
            या सभेमध्ये केंद्रातील 11 जिल्हा परिषद व 2 माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक हजर होते यात शासन परिपत्रकातिल पुढील मुद्द्यावर चर्चा करून योग्य अंमलबजावणी करण्याच्या सुचना केंद्रप्रमुख श्री गायकवाड साहेब यांनी दिल्या यात *शाळेचे निर्जंतुकीकरण करने व स्वच्छता करने, विद्यार्थी मास्क,सॅनिटायझर,साबण यांचा नियमित वापर करतील याकडे लक्ष देणे, संपूर्ण शिक्षकांची कोरोना RTPCR चाचणी करणे, कामाची विभागणी करून विविध कार्यगट गठित करणे,सुरक्षित अंतर ठेवून विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था करणे,शाळाकाळात विद्याथ्याचे सुरक्षित अंतर राहील ही काळजी घेणे, पुढील सरकारी सुचने पर्यंत शाळेत कुठल्याही कार्यक्रमाचे आयोजन करू नये,पालकांचे सहमती पत्र शाळेत जपुन ठेवणे,कोरोना संदर्भात विद्यार्थी व पालकांमध्ये जनजागृती करणे,शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती ही बंधनकारक राहणार नाही,विद्यार्थ्यांच्या आरोग्याची माहिती एकत्रीकरण करून ठेवणे, शिक्षकांनी शिकविताना योग्य अंतर ठेवून आपली शिकवणी पूर्ण करणे* या व अश्या अन्य सूचना बद्दल मुख्याध्यापकांना या सभेमध्ये केंद्रप्रमुख श्री गायकवाड साहेब अवगत करून दिले.