राजुरा तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या परिश्रमाला सुयश.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- ट्रॅक स्टार क्लबच्या राजुरा तालुक्यातील भारत वाटगुरे- CRPF, अक्षय गावंडे-CISF, शुभम खवसे-CISF, विशाल धुमणे-CISF, अजय कन्नाके-CRPF, आदर्श उईके-CISF, विद्या मोहितकर-CRPF या सर्व विद्यार्थ्यांचे केंद्रीय पोलीस दल भरतीमध्ये निवड करण्यात आली आहे. हे सर्व विद्यार्थी ट्रॅक स्टार क्लबचे प्रशिक्षक नागेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली गेल्या चार ते पाच वर्षांपासून प्रशिक्षण घेत होते.
ट्रॅक स्टार क्लबच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून देशसेवेकरिता चयन होत आहे. ज्यामध्ये आर्मी, फॉरेस्ट, CRPF, CISF अशा वेगवेगळ्या घटकामध्ये आपल्या मेहनतीच्या बळावर सुयश प्राप्त केले आहे. खर्या अर्थाने या विद्यार्थ्यांनी राजुरा शहर व तालुक्याचे नावलौकिक केले आहे. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन इतर विद्यार्थ्यांनी स्वत: आणि त्यांच्या पालकांची नावे विविध क्षेत्रात प्रकाशित करण्याचे निश्चय करत असतात.
ट्रॅक स्टार क्लबच्या विद्यार्थ्यांचे केंद्रीय पोलीस दलात निवड झाल्याबद्दल राजुरा येथील नगराध्यक्ष मा. अरुणभाऊ धोटे यांनी महात्मा ज्योतिबा फुले शाळेच्या पटांगणावर शॉल व पुष्पगुच्छ देऊन यशस्वी विद्यार्थ्यांचे सत्कार करून कौतुक केले. त्याप्रसंगी शहरातील अनेक उत्साही आणि विद्यार्थी तेथे उपस्थित होते. त्यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांनी ट्रॅक स्टार क्लबचे प्रशिक्षक नागेश जाधव सर, निःशुल्क पटांगण देणारे म. ज्यो. फुले विद्यालयातील शिक्षकवृंदाचे, नगराध्यक्ष अरुणभाऊ धोटे तसेच सहकार्य करणाऱ्या सर्व वडीलधाऱ्या माणसाचे, मित्रांचे आभार व्यक्त केले.