श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथील माजी विद्यार्थी संघटनेची सभा संपन्न.

Bhairav Diwase

सामाजिक उपक्रमात माजी विद्यार्थी संघटना नेहमी कटिबद्ध:- प्राचार्य डॉ. संभाजी वरकड

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:-  सत्र २०२०-२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यासाठी  श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथील माजी विद्यार्थी संघटनेची सभा दि. १७/०१/२०२१ रोज रविवारला सकाळी ११:०० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये  प्राचार्य डॉ. वरकड सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
        

      त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अविनाशजी जाधव, प्रमुख पाहुणे प्राचार्य टी. सी. जोसेफ,  विशेष अतिथी म्हणून माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अविनाशभाऊ दोरखंडे, उपप्राचार्य डॉ. राजेश खेराणी, माजी विद्यार्थी संघटनेचे संयोजक डॉ संतोष देठे, राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ राजेंद्र मुद्दमवार, रासेयो प्रमुख बल्की सर, मल्लेश रेड्डी सर या मान्यवरांची उपस्थिती होती.
          
        श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे स्वयंसेवक  विशाल मनोहर शेंडे याला २०१९-२० वर्षातील गोंडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल मान्यवरांचा हस्ते विशाल शेंडे याला पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. सोबतच माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य मनोज तेलीवार हे मागील अनेक वर्षांपासून नविन वर्षाच्या पहिल्या दिवशी रक्तदान करत असतो म्हणून नविन वर्षाच्या पहिला रक्तदाता म्हणून मान्यवरांचा हस्ते मनोज तेलीवार यांना पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
                
          श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथील माजी विद्यार्थी संघटना हे दरवर्षी वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवित असतात. त्यामध्ये व्यक्तिमत्त्व विकास, अभ्यास दौरा, वादविवाद स्पर्धा, नाट्य व नृत्य कला, कोरोना काळात राजुरा तालुक्यामध्ये कापडी मास्क तयार करून त्याचे वितरण, गरजूंना आर्थिक मदत, अशाप्रकारच्या अनेक सामाजिक उपक्रम माजी विद्यार्थी संघटने तर्फे होत असते. कोरोनाचा महामारीमध्ये लाकडाऊन नंतर सत्र २०२०-२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली सोबतच श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा  येथील नविन माजी विद्यार्थ्यांचा समावेश संघटनेमध्ये करण्यात आले.
                        
        त्याप्रसंगी माजी विद्यार्थी संघटनेचे प्रा. सुयोग साळवे, प्रा. देविदास कुईटे , प्रा. राजू डाहुले, राजू गोखरे, प्रिया देठे, राहुल थोरात, केतन जुनघरे, तमन्ना शेख, महेंद्र सेपुरवार, भारत भोयर, संदीप खोके, मनोज तेलीवार, शरद लांडे, तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुयोग साळवे यांनी केले तर आभार राजू गोखरे यांनी मानले.