चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा तर्फे चेक आष्टा येथे सॅनिटरी नॅपकिनचे वितरण.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Jan 19, 2021
पोंभुर्णा:- स्थानिक चिंतामणी महाविद्यालय पोंभुर्णा तर्फे राष्ट्रीय सेवा योजना दत्तक ग्राम चेक आष्टा येथे महिला समूह, राष्ट्रीय सेवा योजना, आणि तक्रार निवारण समिती तर्फे चेक आष्टा या राष्ट्रीय सेवा योजना दत्तक गावामध्ये सॅनिटरी नॅपकिन चे वितरण करण्यात आले. महिला समूहाच्या अध्यक्षा डॉक्टर नरवाडे मॅडम यांनी या कार्यक्रमाप्रसंगी covid-19 याविषयी कोणती काळजी घ्यावी व सॅनिटरी नॅपकिनचा वापर कसा करावा याचे महत्त्व पटवून दिले.
 

    या कार्यक्रमासाठी चेक आष्टा येथील अंगणवाडी सेविका सीमाताई मरस्कोल्हे यांचे मोलाचे सहकार्य लाभले तसेच या कार्यक्रमाला ज्ञानेश्वर मरस्कोल्हे, महाविद्यालयाचे प्राचार्य पठाण सर, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. घोडेस्वार, सर प्राध्यापक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.