(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- चंद्रपूर जिल्हयातील राजुरा तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणूकीत भारतीय जनता पार्टी समर्थीत शेतकरी ग्रामीण विकास आघाडीने घवघवीत यश संपादीत केले आहे. राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार ऍड. संजयभाऊ धोटे तसेच माजी आमदार सुदर्शनजी निमकर यांच्या नेतृत्वामध्ये राजुरा तालुक्यातील 28 ग्रामपंचायती पैकी 14 ग्राम पंचायतींवर भाजपाने आपले वर्चस्व सिध्द केले आहे. चुनाळा मध्ये 13 पैकी 13, सातरीमध्ये 7 पैकी 7, चिंचोली (बु)मध्ये 9 पैकी 5, पवनी मध्ये 7 पैकी 4, वरोडा येथे 7 पैकी 5, खामोना मध्ये 7 पैकी 5, पेल्लोरा मध्ये 7 पैकी 5, धानोरा मध्ये 7 पैकी 5, कोहपरा मध्ये 7 पैकी 6, कढोली मध्ये 9 पैकी 7, सुमठाणा मध्ये 7 पैकी 4, खिडशी मध्ये 7 पैकी 5 , सिंधी मध्ये 3 पैकी 3 तर कोलगाव मध्ये 7 पैकी 6 या ग्राम पंचायतींवर भाजपाने आपले वर्चस्व सिध्द केले आहे.
त्याकरिता माजी अर्थ तथा वन नियोजन मंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. हंसराजजी अहीर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी विजयी झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले.
यावेळी जिल्हा परिषद सभापती सुनील उरकुडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे, विनायक देशमुख, भाजपा तालुका महामंत्री प्रशांत घरोटे, दिलीप वांढरे, अरुण मस्की, वाघुजी गेडाम, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन शेंडे, दिलीप गिरसावळे, विलास खिरटकर, पराग दातरकर तसेच भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात विजयी उमेदवारांचे या अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.