छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्या मागे माता जिजाऊची शक्ती:- मुख्य मार्गदर्शिका अर्चनाताई भोंगळे
राजमाता जिजाऊ हिंदवी स्वराज्याचे प्रेरणास्थान:- प्रयास सखी मंच अध्यक्षा किरणताई बोढे.
भंडारा जळीत प्रकरणातील मृत बालकांना मौन श्रद्धांजली.
चंद्रपूर:- घुग्गुस येथील सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस द्विप प्रज्वलीत व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. प्रमुख पाहुण्याचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष्या व सामाजिक कार्यकर्त्या सौ. सरस्वता पाटील यावेळी म्हणाल्या बालपणापासून शिवबाला माता जिजाऊने धडे दिले. आज जगाला शिवबा पाहिजे माता जिजाऊ च्या कुशल शिकवणी मुळे शिवबा झाला आणि स्वामीजी हे मोठे समाज सुधारक होते शिकागो येथील सर्वधर्म परिषदेत सर्वांना माझ्या बंधू आणी भगिनींनो असे संबोधून आपला परिचय दिला असे त्या म्हणाल्या.
यावेळी मुख्य मार्गदर्शिका अर्चनाताई भोंगळे म्हणाल्या छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्या मागे माता जिजाऊची शक्ती आहे. मराठी स्वराज्याची निर्मिती माता जिजाऊ मुळे झाली असे त्या म्हणाल्या.
यावेळी जिप महिला व बालकल्याण सभापती नितुताई चौधरी म्हणाल्या माता जिजाऊ बद्दल सांगणे तेवढे कमीच आहे. त्या 16 व्या शतकातील असताना त्यांच्या कडून खूप शिकण्यासारखे आहे. माता जिजाऊ मुळे शिवबा घडला असे त्या म्हणाल्या.
यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रयास सखी मंच अध्यक्ष किरणताई बोढे म्हणाल्या राजमाता जिजाऊ यांचे अद्वितीय चरित्र व कर्तृत्व आहे. उत्तम प्रशासक, युग प्रवर्तक, समाज सुधारक, दृढनिश्चयी, कृतिशील, मुत्सद्दी, उत्तम संघटक, व राजकारणी म्हणून त्या घडल्या. राजे शिवाजी महाराज यांना त्यांनी आपल्या शिकवणीतून घडविले माता जिजाऊ हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणास्थान होत्या असे त्या म्हणाल्या.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाच्या अध्यक्ष्या सौ. सरस्वता पाटील, मुख्य मार्गदर्शिका सौ.अर्चनाताई भोंगळे, प्रयास सखी मंच अध्यक्ष सौ. किरणताई बोढे, जिप महिला व बालकल्याण सभापती नितुताई चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य कुसुमताई सातपुते नंदा कांबळे सुचिता लुटे वैशाली ढवस उपस्थित होत्या.
कार्यक्रमास प्रामुख्याने सुनीता पाटील सौभाग्या तांड्रा पुष्पा रामटेके नाझीमा कुरेशी संध्या जगताप माया मांडवकर जनाबाई निमकर नाजिया शेख प्रतिमा बहादे अनिता लालसरे साधना शिन्दे नफिसा खान निषाद शेख प्रेमा कैथल सुलभा ठाकरे सपना मांढरे सुरेख कैथल रिता बर्रे वंदना सातपुते सिंधू कार्लेकर प्रीती धोटे प्रिया नागभीडकर सोनू बहादे व मोठ्या संख्येत महिला उपस्थित होत्या उपस्थित होते.
संचालन सुनंदा लिहीतकर यांनी केले आभार शीतल कामातवार यांनी मानले.
कार्यक्रमच्या यशस्वीते साठी गौरव ठाकरे उमेश दडमल मोहनीश हिकरे यांनी प्रयत्न केले.