कोरपना:- गडचांदुर येथे काल गोंडवाना गणतंत्र पार्टी च्या वतीने विशेष सभा व स्व गोदरुपाटील जुमनाके यांची श्रध्दांजली कार्यक्रमाचे आयोजन पाटबंधारे विभागातील विश्राम भवन येथे करण्यात आले होते. याकार्यक्रमात अध्यक्षस्थानी गोंगपा जिल्हाध्यक्ष श्री बापुराव मडावी हे होते. कार्यक्रमाला विशेष उपस्थिती गोंगपा सचिव भारत आत्राम श्री पांडुरंग जाधव संचालक सिडीसिसी बँक चंद्रपूर , ममता जाधव सामाजिक कार्यकर्ता, मुनीर सय्यद, हमीद भाई , भिमराव पाटील जुमनाके, भिमराव मेश्राम, दिपक पेंदोर सामाजिक कार्यकर्ते गोंडपिपरी मेहबुबभाई , अल्फ सं.सेल जिवती, निशिकांत सोंनकांबळे , संजय सोयाम ,कुंभरे मेजर व राजुरा विधान सभा क्षेत्रातील पक्षातील निष्ठावंत गोंगपा कार्यकर्ते उपस्थित होते. प्रथमतः पक्षाचे आवडे लोकनेते दिविगंत स्व . गोदरू पाटील जुमनाके यांना पक्षाच्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आले. त्यानंतर चर्चा करून सर्वानुमते एकमताने ठराव घेऊन माजी नगराध्यक्ष श्री गजानन गोदरू पाटील जुमनाके यांची राजुरा विधानसभा अध्यक्ष व अब्दुल हमीद भाई देवाळा यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आले. निवड प्रसंगी बुके, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले व पक्षाला मजबूत करण्यासाठी चिंतन करून आदरणीय जेष्ठ लोकनेते नेते स्व गोदरु पाटील जुमनाके यांचे स्वप्नपुर्ती करिता तनमनधनाने जोमात कार्यकर्त्यांमध्ये स्फुर्ती निर्माण करण्यात आले
गोंडवाना गणतंत्र पार्टी राजुरा विधानसभा अध्यक्ष पदी गजानन गोदरु पाटील जुमनाके यांची एकमताने निवड.
बुधवार, जानेवारी १३, २०२१