Top News

जागतिक अलामा अबाकस स्पर्धेत स्पंदन मानकर चे यश.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती- जागतिक अलामा अबाकस स्पर्धेत तालुक्यातील मुरसा येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यालय चे शिक्षक श्री एस एच मानकर सर यांचा मुलगा स्पंदन मानकर याने प्राविण्य प्राप्त केले त्याबद्दल नुकताच त्याचा सत्कार करण्यात आला
या वर्षी प्रथमच ऑनलाइन झालेल्या या स्पर्धेत गणितीय उदाहरणांची सोप्या पद्धतीने उत्तरे काढली जाते ही स्पर्धा 3 जानेवारी ला एकाच वेळी संपूर्ण जगभर घेण्यात आली होती या अभिनव स्पर्धेत एकाच वेळी हजारो विद्यार्थी सहभागी झाले होते या स्पर्धेत 7 मिनिट मध्ये एकूण 90 प्रश्न विचारले गेले यात जगातील अमेरिका,ऑस्ट्रेलिया, दुबई,अबू धाबी, सिंगापूर, मलेशिया व भारत येथील हजारो स्पर्धक सहभागी झाले होते यात स्पंदन मानकर याने प्राविण्य प्राप्त केले विशेष म्हणजे मागील वर्षी याच राष्ट्रीय स्पर्धेत स्पंदन हा ज्युनिअर गटात देशात पहिला आला होता हा घुग्घुस येथील माऊंट कारमेल कॉन्व्हेंट चा वर्ग तिसरी चा विद्यार्थी आहे
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अलामा अबाकस चे दिग्दर्शक पद्मावती मुथुकुमार, जि. मुथुकुमार अय्यर व महाराष्टचे फ्रेंचायसी वाणी रामजी मॅडम यांनी मेहनत घेतली.



विजेत्याला पुरस्कार व प्रमाणपत्र नुकतेच मार्गदर्शक शिक्षिका मीनाक्षी नेरकर मॅडम व टी. एस. नेरकर सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले
तो आपल्या यशाचे श्रेय आई वडील व शिक्षकांना देतो
या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने