सावली:- सावली तालुक्यातील पाथरी येथील बौद्ध विहार चौक येथे पाथरी तालुका निर्माण कृती संघर्ष समितीच्या वतीने चौकात जनतेच्या मागणीनुसार प्रकाशमय लाईट्स ची गरज लक्षात घेता हॅलोजन लाईट्स ची व्यवस्था करण्यात आली, या आधी सुद्धा संविधान चौक बस स्टॅन्ड पाथरी येथे अश्याच लाईट्स ची व्यवस्था करण्यात आली होती. पाथरी तालुका निर्माण संघर्ष कृती समिती पाथरीच्या विकासाच्या दृष्टीने अविरत संघर्ष करीत आहे, सध्या ग्रामपंचायत निवडणूक पार पडली असून या समितीचे अध्यक्ष तथा नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य श्री प्रफुल तुम्मे यांच्या संकल्पनेतून नवनिर्वाचित सदस्य श्री प्रवीण वाघमारे, सौं अल्का ताई वाघधरे, सौं प्रीती ताई लाडे तथा समितीचे सचिव मिथुन मेश्राम, श्री भुजंग वाणी, अरुण वलादे लाईट्स लावताना उपस्थित होते
पाथरी तालुका निर्माण संघर्ष कृती समितीने केली हॅलोजन ची व्यवस्था.
रविवार, जानेवारी ३१, २०२१
Tags