नागेश सुखदेवे यांच्या नवोपक्रमाची राज्यस्तरावर निवड.

Bhairav Diwase
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भोयेगाव येथील भाषा विषय शिक्षक.
Bhairav Diwase. Jan 09, 2021
कोरपना:- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भोयेगाव येथील भाषा विषय शिक्षक नागेश सुखदेवे यांच्या 'धरुनी शब्द कोडयांची कास -करु इंग्रजीचा विकास' या नवोपक्रमाची निवड राज्य स्तरावर झालेली आहे. नवोपक्रम स्पर्धा 2020-21 अंतर्गत प्राथमिक शिक्षक, पर्यवेक्षिय अधिकारी व विषय तज्ञ यांचेकरीता ही स्पर्धा आयोजित केलेली होती. सध्या कोरोना काळ असल्यामुळे या स्पर्धेचे आयोजन आँनलाईन करण्यात आले होते.
     
    सदर नवोपक्रम हा कोवीड -19 च्या काळात माहे मार्च ते सप्टेंबर 2020 या काळात विद्यार्थी जेव्हा घरूनच अभ्यास करीत होते त्याच काळात घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वतः कृतीशील सहभाग घेऊन अध्ययन करावे व सृजनशिलतेला वाव देऊन नवनिर्मिती करावी असे या नवोपक्रमाचे वेगळेपण आहे. नवोपक्रमानंतर विद्यार्थ्यांच्या शब्दसंपत्तीत
      
   वाढ होऊन ,इंग्रजी भाषेतील साहित्य आवडीने वाचतात.विद्यार्थी स्वतः शब्दकोडे तयार करून इतरांना शब्दकोडे सोडवायला देत आहेत.
   
         त्यांच्या निवडीबद्दल प्रेमचंद रत्नमाळ मुख्याध्यापक, प्रभाकर जुनघरे,नामदेव बावणे, रवींद्र लामगे शिक्षण विस्तार अधिकारी, आनंद धुर्वे गटशिक्षणाधिकारी, सहकारी निलेश कुमरे, धनराज सोनवाने ,मंजुषा पवार, शुद्धोधन मेश्राम,संभा गावंडे, दुशांत निमकर, उमाजी कोडापे,प्रविण बुच्चे,बाळु गावंडे, प्रदीप टिपले, चानकुमार खोब्रागडे, होमेंद्र मेश्राम यांनी तसेच इतर सहकारी शिक्षक बांधवांनी अभिनंदन केलेले आहे.