(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुका पत्रकार संघाचे वतीने आज पत्रकार दिन निमित्याने पत्रकारिते सोबत सामाजिक कार्य करणाऱ्या पत्रकार तसेच कोरोना लाकडाऊन काळात जीव धोक्यात घालून कार्य करणाऱ्या आरोग्य कर्मचारी व अंगणवाडी सेविका,आशा वर्कर यांचाही मान्यवरांचे हस्ते स्मृती चिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार अडव्होकेत वामनराव चटप याचे हस्ते करण्यात आले तर अध्यक्षस्थानी आमदार सुभाष धोटे होते, प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अरुण धोटे,माजी आमदार सुदर्शन निमकर, सुमनताई मामुलकर, व्यापारी संघाचे अध्यक्ष राधेश्याम अडाणीया,पोलीस निरीक्षक नरेंद्र कोसुरकर,वन परिक्षेत्र अधिकारी विदेश कुमार गलगट उपस्थित होते.
बाळशास्त्री जांभेकर यांचे प्रतिमेस माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांचे हस्ते लाईव्ह चंद्रपूर चे प्रतिनिधी, तथा सावली न्यूज चे उपसंपादक संतोष कुंदोजवार, लोकमतचे रत्नाकर चटप,देशोन्नतीचे गणेश बेले, सकाळ चे सिद्धर्थ गोसावी, जेष्ठ पत्रकार मसूद अहमद, तसेच राजुरा तालुक्यात नरभक्षक वाघाला यशस्वी पाने पकडण्याची मोहिम राबविलेल्या वन कर्मचारीच सन्मान म्हणून वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगत तसेच कोरोना योद्धा म्हणून आरोग्य विभागातील वैद्यकीय अधीक्षक लहू कुलमेथे आणि आरोग्य कर्मचारी, देवाला, चिंचोली,काढोली,विरुर येथील आरोग्य कर्मचारी,आशा वर्कर,अंगणवाडी सेविकाचाही स्मृती चिन्ह,शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन आनंद चलाख यांनी केले अनिल बाळसराफ यांनी प्रास्ताविक केले तर भीमय्या बोर्डेवार यांनी आभार मानले, कार्यक्रमात तालुक्यातील पत्रकार, आरोग्य कर्मचारी, उपस्थित होते.