Top News

तालुक्यात ग्रा.पं.चुनाव विजयासाठी 805 उमेदवारांचा लढा.

तालुक्यात एकूण ६७२१५ मतदार मतदानाचा हक्क बजावणार.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- तालुक्यातील शासनाने नुकताच होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकिची मतदान प्रक्रिया हि 15 जानेवारी २०२१ ला सकाळी ०७:३० वाजेपासून सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत असणार आहे. सिंदेवाही तालुक्यात एकूण ४५ ग्रामपंचायत ची निवडणूक होणार होती. त्यापैकी १ सामदा खुर्द ग्रामपंचायतला बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे उर्वरित ४४ ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. ३८५ जागेसाठी ही निवडणूक होती. पण ८५ उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहे. तसेच ४ जागेसाठी नामनिर्देशन आलेले नाही. म्हणून सिंदेवाही तालुक्यात २९६ जागांसाठी निवडणूक होत आहे. 

       सिंदेवाही तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकसाठी एकूण उमेदवारी अर्ज हे ९१३ प्राप्त झाले. त्याचपैकी एकूण १९ हे अवैद्य ठरले. व ९७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहे. रणांगणात आत्ता ८०५ उमेदवार उभे आहेत. त्यामुळे सिंदेवाही तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकसाठी आत्ता ८०५ उमेदवारांचा प्रचाराचा प्रवास सुरू झाल्याचं चित्र गावागावांत बघायला मिळत आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकसाठी ४४ ग्रामपंचायतला १४७ बूथ असणार आहेत. निवडणूक प्रकियेकरिता १६५ मशीन तहसिल कार्यालयात आलेल्या आहेत. सिंदेवाही तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूकिची रणधुमाळी सुरू झाली आहे.तालुक्यातील दिग्गज राजकिय नेतृत्व करणारे व्यक्तीची खरी परीक्षा सुरू आहे.या परीक्षेत कोणाच्या नेतृत्वाला यश प्राप्त होईल याकडे सर्व नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. तालुक्यातील उमेदवार हे आपापल्या गावात घरोघरी जाऊन आपले विचार सांगण्यात मग्न दिसून येत आहेत.त्याचप्रमाणे सिंदेवाही तालुक्यात एकूण पुरुष मतदार ३३८६९ व स्त्री मतदार ३३३४६ दोन्ही मिळून ६७२१५ मतदार हे संविधानिक लोकशाहीने दिलेल्या मौल्यवान मताचा अधिकार बजावणार आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने