राहुल गांधी विचार मंच जिल्हाध्यक्षपदी सुरेखा चिडे यांची निवड.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- माजी महिला तालुका अध्यक्ष म्हणून राजुरा तालुक्यातील गोवारी निवासी परिसरात वास्त्यावात असलेले सद्या चंद्रपूर येथिल रहावासी सुरेखा चीडे यांची राहुल गांधी विचार मंच या पदावर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. राजुरा महिला तालुका अध्यक्ष असताना यांनी राजुरा तालुक्यात कॉंग्रेस पक्षा ला मजबूत करण्यासाठी तळमळीने कार्य केले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेत काल त्यांना राहुल गांधी विचार मंच जिल्हाध्यक्षपदी पदावर निवड करण्यात आली. योगेश मडावी जिल्हा अध्यक्ष राहुल गांधी विचार मंच, मिनाक्षी सावळकर, अश्विनी खोब्रागडे, नंदाताई अलुरवार सिद्धता मिलमिले, उमेश मिलमिले, सय्यद जाकीर यांनी जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने