अभाविप भद्रावती शाखेतर्फे स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ जयंती व राष्ट्रीय युवक दिन उत्साहात साजरा.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- अभाविपच्या भद्रावती शाखेतर्फे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती येथील लोकमान्य विद्यालयाच्या सभागृहात आज दि.१२ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

  या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. सुरेश परसावार, प्रमुख अतिथी म्हणून अमित गुंडावार, प्रमुख वक्ते म्हणून प्रा. गायकवाड व दामोदर दिवेदी उपस्थित होते.
    
        यावेळी प्रा. गायकवाड व दामोदर दिवेदी यांनी स्वामी विवेकानंदांच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला. तर जिजाऊ माता यांनी स्वराज्य पुत्र कसा घडविला हे अमित गुंडावार यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमाच्या अखेर सर्व विद्यार्थ्यांनी 'नंद के आनंद की, जय विवेकानंद की' , 'जय जिजाऊ, जय शिवराय', "जिस युवकका खुन न खौले, खुन नही वो पानी है, अगर वो देश के काम ना आये, वो बेकार जवानी है", 'जय हिंद-जय भारत' अशा उत्साहात घोषणा दिल्या.