जुनगाव ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Jan 19, 2021
पोंभुर्णा:- जुनगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजयुमो तालुका उपाध्यक्ष राहुल भाऊ पाल यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी ग्रामीण विकास आघाडीचे उमेदवार बहुमताने निवडून आले. 

    ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२१ जुनगाव ग्रामपंचायत निवडणुकीत राहुल काशिनाथ पाल, विसवेस्वर नानाजी भाकरे, तेजपाल आनंदराव रंगारी, पुनम राहुल चुधरी, पलवी किशोर देशमुख, सोनी चंद्रकांत चुधरी, माधुरी प्रकाश झबाडे विजयी झाले आहे. ७ पैकी ७ उमेदवार विजयी होऊन ग्राम पंचायत जुनगाव ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा. जुनगाव गावातील मतदार बंधू भगणींचे विजयी उमेदवारांने जाहीर आभार मानले.


विजयी उमेदवारांचे माजी अर्थ तथा वन नियोजन मंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री मा. हंसराजजी अहीर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी विजयी झालेल्या उमेदवारांचे अभिनंदन केले.
         
     यावेळी भाजपा महिला जिल्हाध्यक्ष पंचायत समिती सभापती अल्का आत्राम, भाजपा तालुकाध्यक्ष गजानन गोरंटीवार, पंचायत समिती सदस्य विनोद देशमुख, भाजयुमो तालुकाध्यक्ष अजय मस्के भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.