धानोली येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी.
कोरपना:- तालुक्यातील धानोली येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी साजरी करण्यात आली. स्त्री कोणत्याही क्षेत्रात कमी नाही आता स्त्रियांनी गावाला आदर्श करण्यासाठी पुढे यावं, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी हाल अपेष्टा सहन करत स्त्री शिक्षणाचे बीज रोवले त्याप्रमाणे सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेऊन धानोली ला स्मार्ट ग्राम करण्यासाठी तसेच लघुउदयोग आणि स्वयं चालित व्यवसाय स्थापन करून कुटूंबाचा सुद्धा विकास साधण्यासाठी महिलांनी प्रयत्न करावे असे प्रतिपादन धानोली येथील सरपंच विजय रणदिवे यांनी अध्यक्षिय भाषणात बोलताना केले. या वेळी सौ. सुषमाताई चं. किन्नाके, सौ प्राचीताई आडे ग्रा. पं. सदस्य, कु. सुनीताताई सुर अंगणवाडी सेविका, सौ. प्रेमीलाताई मडावी आशावर्कर, सौ. कलिंदाताई किन्नाके गटप्रवर्तक, सौ. सुनीताताई किन्नाके मोबिलायझर, श्रीमती सिंधूबाई मडावी, सौ. विमलबाई मडावी, रसिका मडावी, कांताबाई मडावी, कु. शीतल मडावी, ज्योतीराव मंगाम, चंद्रभान किन्नाके (शिक्षक), रामदासजी मडावी तसेच गावातील असंख्य महिला व पुरुष उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कलिंदाताई किन्नाके यांनी तर आभार प्रदर्शन कु. शीतल मडावी यांनी केले. यावेळी उपस्थित सर्व महिलांनी स्वप्रयत्नातून गावाचा आणि कुटुंबाचा विकास साधण्याचा संकल्प केला.