Top News

विभागातील पहिले ग्रामीण घरकुल मार्ट भद्रावती तालुक्यातील आष्टा ग्राम पंचायतीत.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- उमेद अभियाना अंतर्गत महिला शक्ती ग्रामसंघ ग्रामीण घरकुल मार्ट हा नाविन्यपूर्ण उपक्रम भद्रावती तालुक्यातील आष्टा ग्राम पंचायतीत राबविला जात असून नागपूर विभागातील पहिलाच उपक्रम आहे.

            नुकतेच दि.७ जानेवारी रोजी या उपक्रमाचे उद्घाटन चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी भद्रावती पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी डाॅ.मंगेश आरेवार, शाम मडावी, ग्रामसेवक भारत राठोड, राकेश तुरारे, मिलिंद नागदेवते, महिला शक्ती ग्राम संघाचे पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते. 

                   'सर्वांसाठी घरे-२०२२' हे केंद्र शासनाचे महत्त्वाकांक्षी धोरण असून राज्य शासनाने देखील या धोरणाचा स्विकार केला आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण), राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना ,पारधी आवास योजना, कोलाम आवास योजना, ई. घरकुलबाबत राबविण्यात येतात. या योजनांची अंमलबजावणी गतिमान व गुणवत्तापूर्ण राबविण्याकरिता राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून २० नोव्हेबर २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या १०० दिवसांच्या कालावधीत 'महाआवास अभियान ग्रामीण' राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. घरकुल अंतर्गत घरकुल लाभार्थींना घर बांधण्यासाठी चे सर्व साहित्य( सिमेंट ,लोहा ,विटा ,दरवाजे, खिळे, तार, शौचालय , सिट,खिडकी ई.) एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे .घरकुल मार्ट सुरू होण्यापूर्वी लाभार्थींना घरकुला करिता लागणारे सर्व साहित्य चंदनखेडा ,शेगाव ,वरोरा सुमारे १० ते १५ किलोमीटर अंतरावरून आणावे लागत असल्याने लाभार्थींचा वाहतुकीचा खर्च तसेच वेळ सुद्धा बचत होणार आहे.

     या घरकुल मार्ग चा फायदा आष्टा ग्रा.प. परिघातील मानोरा (सि.), कारेगाव, किन्हाळा, वडाळा (तू), सोनेगाव, काटवल (भ),घोसरी ,पळसगाव, रानतळोधी ,अशा ताडोबा व्याघ्र प्रकल्पांना लागून असलेल्या सुमारे ८ ते १० गावांना थेट फायदा होणार आहे. तसेच ग्रा.प. आष्टा येथील जवळपास १०० ते ११० घरकुल लाभार्थींना सर्व साहित्य माफक दरामध्ये चांगल्या गुणवत्तेचे उपलब्ध होणार असल्यामुळे थेट फायदा होणार आहे .घरकुल मार्ट हा नाविन्यपूर्ण उपक्रम मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात येत असल्याचे संवर्ग विकास अधिकारी डाॅ. मंगेश आरेवार यांनी सांगितले.

    या उद्घाटन प्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी उमेद अभियान आणि आवास योजनाचे नाविन्यपूर्ण उपक्रम अतिशय कमी वेळेमध्ये पूर्णत्वास नेल्याबद्दल सर्व महिला आणि घरकुल टीमचे अभिनंदन करत आनंद व्यक्त केला. ही घरकुल मार्ट संकल्पना चंद्रपूर जिल्ह्य लाच नव्हे तर संपूर्ण नागपूर विभागाला दिशादर्शक ठरेल अशी आशा व्यक्त केली .घरकुल मार्ट संकल्पना संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात राबविणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

     आष्टा येथील महिला शक्ती ग्राम संघाची स्थापना १९ सप्टेंबर २०१७ रोजी झाली असून त्यात २४८ महिला समाविष्ट आहेत.तसेच एकूण २४ समूह या ग्राम संघाला जोडले आहेत. आतापर्यंत या ग्रामसंघाला अभियानाकडून १२ लाख ८० हजाराचा निधी प्राप्त झाला आहे.त्यात सुक्ष्म गुंतवणूक उपजिविका निधी, खेळते भांडवल, जोखिम प्रवणता निधी, ग्रामसंघ व्यवस्थापन निधी, पोषण परसबाग निधी, टेस्टिंग किट यांचा समावेश आहे. तसेच या ग्रामसंघाची आतापर्यंतची उलाढाल १६ लाख १ हजाराची आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने