Top News

घुग्घूस येथील अनेक युवकांचा शिवसेनेत प्रवेश.

Bhairav Diwase. Jan 10, 2021
चंद्रपूर:- घुग्घूस येथील विनेश आगदारी यांचे सह अनेक युवकांनी चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिर्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवसेने मध्ये प्रवेश घेतला.
यावेळी चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिऱ्हे यांनी प्रवेश घेणाऱ्या युवकांच्या गळ्यात शिवसेनेचा दुपट्टा घालून व पुषगुच्छ देऊन स्वागत केले.

हिंदुहृदय सम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार धोरणे वर विश्वास ठेवून व शिवसेना पक्षप्रमुख मु.उद्धव ठाकरे व युवासेना पक्षप्रमुख मा. आदित्य ठाकरे यांच्या कार्यावर विश्वास ठेवून चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिर्हे व युवासेना तालुकाप्रमुख हेमराजभाऊ बावणे यांच्या कामगिरवार विश्वास ठेऊन व घुग्गुस शिवसेना शहरप्रमुख बंटीभाऊ घोरपडे, घुग्गुस युवसेनानेते चेतन बोबडे यांच्या नेतृत्वात घुग्गुस येथील अनेक युवकांनी शिवसेनेत प्रवेश घेतला. 

     विनेश आगदारी, अविनाश मेश्राम, शंकर मेश्राम, कुणाल गेडाम, विनय निखाडे, तेजस सोनटक्के, शुभम कुंभारे, शुभम कस्तुरी व अनेक युवकांनी प्रवेश घेतला आहे.

        यावेळी गणेश शेंडे, योगेश भांदक्कर, महेश शेंडे,कोमल ठाकरे व मोठ्या संख्येत शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने