Top News

विरुर खांबाडा घाटावरून खुलेआम रेतीची चोरी.

रेती तस्करांना पोलीस पाटील व पटवाऱ्याचा आशीर्वाद?

शेतकऱ्यांचा उभ्या मालाचे नुकसान.
(संग्रहित छायाचित्र)
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- महसूल विभागाच्या निष्काळजीपणा व पोलीस पाटील, पटवारी यांच्या आशीर्वादाने राजुरा तालुक्यातील विरुर-खांबाडा नाल्यातून खुलेआम रेतीची तस्करी सुरू असून या परिसरात रेती तस्करांनी अनेक ठिकाणी अवैधरित्या रेती साठवून ठेवल्याची माहिती आहे. आज घडीला खांबाडा नाला रेतीमुक्त झाल्याचे समजते.
             
      खांबाडा घाटावरून दररोज पाच ते सहा ट्रॅक्टर व हायवा राजरोसपणे रेतीची चोरी करीत असून यावर कोणाचाही वचक नाही. रेती तस्कर मुक्तपणे हा व्यवसाय करीत असून त्यांना या गावातील पोलीस पाटील व पटवारी यांचे आशीर्वाद प्राप्त असल्याची परिसरात चर्चा आहे. रेती चोरून नेणारे ट्रॅक्टर व हायवा रेती घेऊन शेतकऱ्यांच्या शेतातून जात असल्याने शेतकऱ्यांच्या उभ्या मालाचे नुकसान होत आहे. 

    याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाला तक्रार करूनही याकडे काना डोळा केला जात आहे. रेती तस्करांचे महसूल विभाग व पोलीस विभागातील लोकांशी अर्थपूर्ण असलेले संबंध रेती चोरांचे मनोबल वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे. आधीच वाईट हवामान व नापिकीच्या गंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांवर शेतमालाचे नुकसान होत असल्याने दुहेरी मार पडत आहे. तरी महसूल विभाग व पोलीस विभागाने वेळीच रेती तस्करांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांच्या झालेल्या पिकांची नुकसान भरपाई रेती तस्करांकडून वसूल करून देण्यात यावी अशी मागणी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष देरकर यांनी केली आहे. रेती तस्करांविरुद्ध वेळीच उपाययोजना न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस या विरुद्ध एल्गार पुकारेल अशा इशारा देण्यात आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने