Top News

वरोरा येथे रक्तदात्यांचा सत्कार तथा साहित्य वाटप कार्यक्रम.

देवराव दादा भोंगळे मित्रपरिवाराच्या वतीने रक्तदात्यांना वाॅटर कॅन व हेल्मेटचे वाटप.

रक्त दान हे एक श्रेष्ठ दान आहे कारण यामुळे एक गरजूंना नवीन जीवनदान मिळते हे कार्य रक्तदात्यांच्या माध्यमातून पार पडते, यापुढे रक्तदात्यांनी या जनसेवेचे कार्यात आपला सहभाग नोंदवावा:- जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे
Bhairav Diwase. Jan 08, 2021
वरोरा:- भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रा.) श्री. देवराव दादा भोंगळे यांच्या जन्मदिनानिमित्त (२१ नोव्हेंबर) यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने जिल्हाभरात अनेक लोकोपयोगी सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले होते. या मध्ये प्रामुख्याने यामध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबिराचा समावेश होतो.
यामध्ये वरोरा शहरात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजनही करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून रक्तदानासारखे महादान केले. 

    त्याच रक्तदात्यांच्या आज सत्कार सोहळा तथा साहित्य वाटप कार्यक्रम वरोरा शहरात पार पडला. रक्त दान हे एक श्रेष्ठ दान आहे कारण यामुळे एक गरजूंना नवीन जीवनदान मिळते हे कार्य रक्तदात्यांच्या माध्यमातून पार पडते , यापुढे रक्तदात्यांनी या जनसेवेचे कार्यात आपला सहभाग नोंदवावा असे आव्हान जिल्हाध्यक्ष देवराव दादा भोंगळे यांनी केले.

     याप्रसंगी रक्तदात्यांना वाॅटर कॅन आणि हेल्मेट देऊन त्यांचे सत्कार करण्यात आले. यावेळी मंचावर, भाजपचे जिल्हाध्यक्ष (ग्रा.) देवरावदादा भोंगळे, वरोरा न.प. नगराध्यक्ष अहेतेशामजी अली, युवामोर्चाचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, युवामोर्चाचे जिल्हा महामंत्री विवेक बोडे, सचिन नरड, भाजपचे ज्येष्ठ नेते नगर सेवक बाबाजी भागडे, शहराध्यक्ष सुरेश महाजन, महिला आघाडीच्या जिल्हा महामंत्री सायरा शेख,रवि कष्टी तालुका महामंत्री मधुकर ठाकरे शहर महामंत्री,विलास गयनेवार शहर महामंत्री, दिलीप घोरपड़े नगरसेवक जगदीश तोटावार, प्रवीण उमाटे, अरुण मोदी, संदिप किन्नाके,बाबा काळमेघ, संदीप विधाते युवामोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान,सूरज धात्रक,प्रतीक काळे, संजु राम, राहुल दागमवार,राहुल आत्राम, नीलेश देवतळे, अमित आसेकर, कादर शेख, महिला आघाडी सुषमा कराड, मत्तेताई, समर्थताई, विद्यार्थी आघाडीचे जिल्हा महामंत्री प्रतीक बारसागडे, युवामोर्चाचे सोशल मीडिया प्रमुख आदित्य शिंगाडे, हरी लंका यांसह आदी मंडळी उपस्थित होते.
आयोजक:- राहुल बांदुरकर

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने