सावली:- ज्ञानज्योती फाउंडेशन तथा माळी समाज सावली यांच्या श्रम दानातून निर्माण झालेल्या महात्मा फुले वाचनालय सावली येथील गोसिखुर्द येथील अधिकाऱ्यांनी अचानक भेट दिली. महात्मा फुले वाचनालय हे सर्वांसाठी खुले असून येथे अनेक विद्यार्थी अभ्यास करतात. वाचनालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क आकारल्या जात नाही. या वाचनालयात अनेक बाहेरचे विद्यार्थी सुद्धा अभ्यास करतात. गोसिखुर्द येथील श्री यतीराज प्रसाद बतुल कनिष्ट अभियंता आणि गणेश सुधाकर बोमावर स्थापत्य अभियांत्रिकी सहायक यांनी भेट देऊन वाचनालयाला २० बुकाचा संच भेट दिले.
या कार्यक्रमाला संचालन विक्रांत कावळे, प्रास्ताविक सुरज गुरनुले, आभार प्रवीण चौधरी यांनी मानले. तसेच यावेळी रवी वाढई, सचिन प्रधाने, महेश मांदाळे, सुरज आवळे, मिलिंद शेंडे, महेश गुरनुले, रोहन महाडोळे, नागेश वाढई, भूषण गुरनुले, शुभम सोनूले, प्रमोद चौधरी, सर्व स्वयंसेवक उपस्थित होते.