(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आणि पत्रकार दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबईच्या भद्रावती तालुका शाखेतर्फे दि.९ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता येथील स्वागत सेलिब्रेशन सभागृहात भद्रावती शहरातील कोरोना योद्ध्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन भद्रावतीचे नगराध्यक्ष अनिल भाऊ धानोरकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रा. महेश पानसे उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूरचे सचिव प्राचार्य डाॅ. अशोकराव जीवतोडे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून पोलिस उप अधीक्षक अविनाश भामरे, तहसीलदार महेश शितोळे, ठाणेदार सुनीलसिंग पवार, न.प.मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, पं.स. संवर्ग विकास अधिकारी डाॅ. मंगेश आरेवार, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. मनीष सिंग, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर वर्मा, पोलिस उपनिरीक्षक सचिन गदादे, महराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ उपाध्यक्ष प्रदीप रामटेके, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुनील बोकडे, जिल्हा कार्याध्यक्ष जितेंद्र चोरडिया, युवा सामाजिक कार्यकर्ते विनायक गरमडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
निमंत्रितांनी कार्यक्रमाला वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे भद्रावती तालुका अध्यक्ष शंकर बोरघरे आणि सरचिटणीस अब्बास अजानी यांनी केले आहे.