चिमूर:- चिमूर तालुक्यातील नेरी येथील रहिवासी व आमडी बे येथिल साईबाबा विद्यालय येथे कार्यरत लिपिक प्रदीप पुडंलीक झाडे यांचा दि. ११ जानेवारी चे रात्री नेरी-चिमूर रोडवर मोटारसायकलचा अपघातात होवून दुर्दैवी निधन झाले आहे.
सध्या चिमूर तालुक्यातील ग्राम पंचायत निवडणूक असून या निवडणूक कार्यक्रमात अनेक कर्मचारी यांच्या नियुक्त्या निवडणूक कामात लागल्या असून दिनांक ११ जानेवारी ला तहसील कार्यालय चिमूर निवडणूक मिटींगमध्ये सहभागी होऊन काम करून रात्री उशिरापर्यंत लिपिक प्रदीप पुडंलीक झाडे हे नेरीला गावाकडे परत जाताना त्याचा चिमूर-नेरी रोडवर मोटारसायकला अपघात होऊन अपघातात दुर्दैवी निधन झाले आहे. यात त्यांच्या वाहनाला अज्ञात वाहनाने धडक दिली की कोणत्या जनावरांना धडक मारली यांचा शोध पोलीस घेत आहे.