(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती शहरातील दोन अल्पवयिन आदिवासी मुली बेपत्ता होण्याचे आणि त्याबाबत आंदोलन करण्याची तयारी सुरु असतानाच शहरातील एका अल्पवयिन मुलीवर कॅडबरी घेऊन देण्याचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
शहरातील एका ७ वर्षीय बालिकेस एका अज्ञात इसमाने कॅडबरी घेऊन देण्याचे आमिष दाखवून तिच्या घरुन आपल्या मोटरसायकलवर बसवून गवराळा परिसरातील फेअरी लॅंड स्कुल जवळ नेऊन अत्याचार केला. ही घटना दि.५ जानेवारी रोजी दुपारी घडली.याप्रकरणी पालकांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भा.दं.वि.३७६ (अ),(ब) आणि पोक्सो कायद्याच्या कलम ( ६) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चालू आहे.