चिचखेडा येथे माजी आमदार चषक-२०२१ स्पर्धेचे बक्षीस वितरण तथा समारोप कार्यक्रम.
ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी तालुक्यातील चीचखेडा येथे युवा क्रिकेट क्लब चीचखेडा यांचेवतीने २५ डिसेंबरपासून सुरू असलेल्या भव्य रबरी बॉल फुल स्पीच क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण तथा समारोप कार्यक्रम आज पार पडले.
याप्रसंगी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करतांना, अशा स्पर्धा सर्वदूर होणे आज गरजेचे आहे, खेळ म्हटल्यावर जीत - हार होणारच इथे खचून न जाता पुढे चालत रहा कारण यातूनच आपल्या सारख्या युवकांमध्ये संगटनवृत्ती निर्माण होते. जसे राजकारणाला अनेक पैलू असतात नेमके तसेच बारकावे व टीममध्ये तसेच नियोजन आपल्याला मैदानात करावे लागतात. यासोबतच इथे उपस्थित झालेल्या सर्व टीमनी उत्तम प्रदर्शन केले आहे. आज आपण चिचखेड्यात खेळलो पण उद्या जावून आपण देशाच्या टीम मध्ये खेळून देशाचे आणि आपल्या जिल्ह्याचे नाव लौकिक करावे. अशी माझी आशा आहे. उद्या तुमच्यातला एखाद युवक देशाच्या टीममध्ये खेळतांना दिसला तर त्याचा अभिमान मलाच नाही तर इथे उपस्थित प्रत्येकाला होईल. असे मत भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी व्यक्त केले.
यावेळी मंचावर, जि. प. अध्यक्षा संध्याताई गुरनुले, माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर, समाजकल्याण सभापती नागराजजी गेडाम, माजी बांधकाम सभापती संतोषभाऊ तंगडपल्लीवार, जि. प. सदस्य संजयजी गजपुरे, सदस्या सौ. दिपालीताई मेश्राम, पं. स. सभापती रामलालजी दोणाडकर, माजी सभापती वंदनाताई शेंडे, रितेशजी अलमस्त, प्रकाशजी नन्नावरे, प्रशांतजी समर्थ, पं. स. सदस्य मानिकजी थेरकर, तनय देशकर, अरुण शेंडे, प्रकाश बगमारे, मनोज वटे, अरविंद नंदुरकर, नीलकंठ मानापुरे, साकेत भानारकर, प्रा. सुयोग बाळबुधे, प्रकाश नन्नावरे, तनय देशकर, शिवाजी चांदेकर, प्रतीक बारसागडे, आदित्य शिंगाडे, मंगेश मादेशवार, श्रीकांत आंबेकर, अविनाश मस्के, धिरज पाल यांसह विविध क्रिकेट टिम आणि क्रिडाप्रेमी मोठ्या संख्येत उपस्थित होते.