नायवाडा येथे स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- नायवाडा येथे स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने वादविवाद भाषण स्पर्धा घेण्यात आल्या तसेच नेहरू युवा मंडळाकडून व सुनील राठोड यांच्या माध्यमातून युवक दिनानिमित्ताने भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात स्वामी विवेकानंद प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.

     या स्पर्धेत प्रथम क्रमांक. पृथ्वीराज राठोड, व्दितीय क्रमांक. बबलु जाधव, तर तृतीय क्रमांक. दिव्या राठोड पटकावले या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच उप सरपंच सौ.मिराताई राठोड, प्रमुखअतिथी म्हणून श्नी.शिवाजी राठोड, कार्यक्रमांचे आयोजक मा.श्नी सुनील राठोड, मार्गदर्शक म्हणून लाभलेले गावचे नाईक श्नी रंगराव जाधव, भिमराव राठोड, सुधाकर राठोड, देविदास राठोड, कैलास राठोड, रविंद्र जाधव, मधुकर पवार, अशोक राठोड, विठ्ठल पवार, बालाजी राठोड, बाबु पवार व सर्व प्रतिष्ठित नागरिक या वेळी उपस्थित होते.