राजुरा:- मौजा विरुर (स्टे.) येथील अल्प भूधारक शेतकरी श्री. सुरेश बंडू दोरखंडे हे दि. १५ नोव्हेंबर 2020 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, आई व बराच मोठा परिवार आहे. ही गोष्ट नाम फाउंडेशन चे कार्यकर्ते श्री. अखिल विरुटकर यांना माहीत होताच, त्यांनी त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्या कुटुंबाला आज दिनांक ३१/०१/२०२१ ला धनादेश स्वरूपात 15,000 रु ची आर्थिक मदत मिळवून दिली. त्या प्रसंगी गावातील नागरिक समीर भुरकुंडे, सचिन मोरे, शंकर पा गोहणे, शगोसाई पा. चौधरी, रोहन कावळे, श्रीमती योगिता सुरेश दोरखंडे(पत्नी), प्रतीक्षा दोरखंडे(मुलगी) श्री. सुनील दोरखंडे व इतर गावातील नागरिक उपस्थित होते.
नाम फाउंडेशन ही संस्था सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते श्री. नाना पाटेकर व श्री. मकरंदजी अनासपुरे यांच्या संकल्पनेतून तयार होऊन ती आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून न्याय देण्याचे प्रयत्न करीत आहे. त्याकरिता आपल्या विदर्भात श्री हरीश इथापे सर विदर्भप्रमुख व श्री. हरीश भगत सर संपर्क प्रमुख म्हणून काम पाहत असतात.
आपल्या परिसरात एखाद्या शेतकरी बांधवाने आत्महत्या केली तर आम्हला माहिती द्या. आम्ही त्यांना आर्थिक लाभ भेटवून देऊ अशी ग्वाही श्री. अखिल विरुटकर व हरीश इथापे सर यांनी दिली.
संपर्क क्र.
अखिल विरुटकर
7057553136
7058569056