Top News

पिकअप-मोटारसायकल अपघातात बीएसएफ जवनासह एकाचा मृत्यू.

Bhairav Diwase. Jan 31, 2021
चिमूर:- चिमुर तालुक्यातील चिमूर-नेरी-नवरगाव मार्गावर नेरीच्या पी.एच.सी. चौकाच्या समोर, वळणावर पिकअप आणि मोटारसायकल यांच्यात भीषण अपघात होऊन या अपघातात बीएसएफ जवान व इतर एक जणांचा असे अपघातात दोघे मृत्यू पावले आहे. हा अपघात शनिवारी दि. 30 जानेवारीला रात्री 8 वाजताचे सुमारास घडला.

      हा अपघात एवढा भीषण होता की पिकअपच्या धडकेत दोन्ही दुचाकीस्वार जागेवर बेशुद्धावस्थेत पडले होते.  तात्काळ अँबूलन्स बोलावून त्यांना उपजिल्हारुग्णालय चिमूर येथे हलविले असता तपासणीअंती त्यांना डाँक्टरांनी मृत घोषित करण्यात आले.

     नथ्थुजी शिवरकर भिवापूर यांच्या मालकीच्या पीकअप एम. एच. 40 BL 9763 या क्रमांकाचा पिकअप सिंदेवाही येथे माल सोडून भरधाव वेगाने परत जात असताना नेरी-नवरगाव मार्गावरील पीएचसी चौकसमोरील वळणावर चिमूर कडून पेंढरी कडे जात असलेल्या दुचाकी क्र.- एम.एच. 34 AZ 8860 या मोटारसायकल जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलस्वार रस्त्यावर दोन्ही बाजूला बेशुद्ध पडले. धडक इतकी भयंकर होती की दुचाकीस्वार कुठलीही हालचाल न करता जागेवरच ठार झाले. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
मोटारसायकल स्वार हे चिमूर आणि सिंदेवाही तालुक्यातील असून हिवराज राजनहिरे वय. अंदाजे 42 वर्षे केवाडा पेठ येथील रहिवासी होता तर पूनम भगवान चौखे हा पेंढरी येथील रहिवासी असून देशाची सेवा करणारा जवान तो बी. एस.एफ. मध्ये वाघा बॉर्डरवर सेवेत होता. मागील 15 दिवसापूर्वी काही कामानिमित्त सुट्टी घेऊन गावाकडे आला होता. काल काही कामानिमित्त ते चिमुरला आले व परत जात असता काळाने झडप घातली आणि अपघातात ते स्वर्गवासी झाले.

     सदर अपघातात पिकअप चालकाने हा अपघात होताच जागेवरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले वाहनाचा पंचनामा करून अज्ञात चालकांची माहिती काढून, त्याला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला त्याला कारावासात पाठविण्यात आले .पुढील तपास ठाणेदार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पी. एस. आय. रेजिवाड मॅडम करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने