Top News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजुरा तर्फे जलसंपदा मंत्री मा. जयंतदादा पाटील यांना निवेदन.

राजुरा येथील वर्धा नदीवर बंधारा बांधण्याबाबत तसेच स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळण्यासंदर्भात निवेदन सादर.

जग्गु साटोनेसह असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- दि. 29/01/2021 रोज शुक्रवारला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजुराचे वतीने तालुका अध्यक्ष संतोष देरकर यांच्या मार्गदर्शनाखाली मा. जयंतदादा पाटील जलसंपदा मंत्री म. रा. तथा प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म. रा. यांना राजुरा येथील वर्धा नदीवर बंधारा बांधण्याबाबत तसेच स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळण्याबाबत निवेदन देण्यात आले तसेच मा. जयंतदादा पाटील यांच्या शुभहस्ते जग्गु साटोने यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश करण्यात आले.
            राजुरा येथील वर्धा नदीवर सध्या रेल्वेचे नविन पुलाचे बांधकाम सुरू आहे. सदर नदीवर बंधाऱ्याचे बांधकाम झाल्यास राजुरा परिसरातील शेती ओलीताखाली येवून शेतकऱ्यांचे जिवनमान उंचावेल तसेच शेतीक्षेत्राची प्रगती होईल. त्याकरीता राजुरा येथील वर्धा नदीवर बंधाऱ्याचे बांधकाम लवकर सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजुरा तर्फे करण्यात आली. 
               सोबतच चंद्रपूर जिल्हयात असंख्य कंपन्या असून विशेषतः राजुरा विधानसभा क्षेत्रात सुध्दा अंबुजा सिमेंट, दालमियाँ सिमेंट, अल्ट्रॉटेक सिमेंट, माणिकगढ सिमेंट, सोलार फॅक्ट्री, डब्ल्यु. सी. एल. इत्यादी कंपन्या असून सदर कंपन्यामध्ये बाहेर राज्यातील लोकांना प्राधान्य देण्यात येते. परंतू स्थानीक असलेल्या सुशिक्षित बेरोजगारांना जाणुनबुजून डावलण्यात येण्याचा प्रकार या कंपन्यांमध्ये पाहायला मिळतात. म्हणून राजुरा विधानसभेतील कंपन्यामध्ये स्थानीक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राजुरा तर्फे जलसंपदा मंत्री मा. जयंतदादा पाटील यांना करण्यात आली. 
                  त्याप्रसंगी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आसिफ सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष रखीब शेख, राजू दादगाळ, स्वप्नील बाजूजवार, सुजीत कावळे, संदीप पोगला, स्वप्नील वाढई, शकील भाई, राजू बूरूले, करण चील्का तसेच असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने