नागपूर-चंद्रपूर महामार्गावर अनियंत्रित ट्रक दुकानात शिरला.

Bhairav Diwase

Bhairav Diwase.     Jan 30, 2021
चंद्रपूर:- नागपूर-चंद्रपूर महामार्गावर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव वेगाने विकास विद्यालय शाळासमोरील हॉटेल, गाडी दुरुस्ती व टायर पंचरच्या दुकानात घुसला. यात तीनही दुकानाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.

       सुदैवानी जीवित हानी झाली नसली तरी तिनही दुकानाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. टीएन 20 टी- 6004 क्रमांकाचा ट्रक चंद्रपूर कडून नागपूरकडे जात होता. भरधाव ट्रक नंदोरी येथील विकास विद्यालयाचे जवळ आला असता ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे ट्रक किरण गहुकर यांचे हॉटेल, जहीर खान यांचे गाडी दुरुस्ती व रमेश साहू यांचे पक्चर दुरस्तीचे दुकानात घुसला. यात तिनही दुकानांचे व ट्रकचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. वेळी हॉटेलमध्ये कारागीर व चौकीदार झोपले होते. टायर पंचरच्या दुकानात दुरुस्ती करणारा रमेश गाढ झोपेत होता. त्याच्या दुकानाला धडक बसून नुकसान झाले. पण तो बाहेर फेकल्याने तो वाचला. या अपघातामध्ये जीवित हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात व्यवसायिकांची आर्थिक नुकसान झाले आहे.