🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू, तिघे जखमी.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- नागपूर चंद्रपूर मुख्य मार्गावरील मानोरा फाट्याजवळ दुचाकीस्वाराला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू तर तिघे जण जखमी झाल्याची घटना काल शुक्रवारला घडली. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल केल्या गेला आहे. यातील दिपाली विनोद जालरवार वय 34 चंदनखेडा असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

      विनोद वासुदेव जालरवार वय 42, वेदांत विनोद जालरवार वय 11 वर्ष, निदांत विनोद जालरवार वय 5 वर्ष असे जखमींची नावे असून हे मोटरसायकल क्रमांक एम एच 34 बीई 0898 या क्रमांकाच्या दुचाकीने पती-पत्नी सह दोन मुलं चंद्रपूर वरून साक्षगंधाच्या कार्यक्रम आटपून चंदनखेड्याकडे जात असताना मानोरा फाट्याजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते जखमी झाले यातील जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असता यातील महिला दिपाली चा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भद्रावती पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास भद्रावती पोलिस करीत आहे.