चिमूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात गणराज्य दिन निमित्त ध्वजारोहण कार्यारंभ न झाल्यास उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन दोषी ठरेल.

Bhairav Diwase
चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे मंत्रालयातील मुख्य सचिव यांना पत्र.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमूर विधानसभा क्षेत्राच्या मुख्यालयी चंद्रपूर जिल्ह्यात चिमूर येथे शासनाने अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर केले आहे.नियुक्तीनंरही अप्पर जिल्हाधिकारी चिमूर कार्यालयात संबंधितांनी पदभार न स्वीकारून प्रत्यक्ष कामकाज सुरु न केल्याने कार्यालय सुरू होण्यासाठी आमदार बंटीभाऊ भांगडीया यांचे बरेच पत्रव्यवहार झाले असतानाच स्थानीक चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार श्री अशोकजी नेते यांच्या पत्रव्यवहारावरही कार्यवाही प्रलंबित असल्याचे दिसते.
    पदसिद्ध अधिकाऱ्याच्या हस्ते भारताच्या स्वातंत्र दिनी १५ आगस्ट २०२० रोजी ध्वजारोहण होण्यास जनता आग्रही व आमदार बंटीभाऊ यांचे पत्रव्यवहार असतांनाही मा. उपविभागीय अधिकारी चिमूर यांच्या हस्तेच ध्वजारोहण पार पडल्या गेले व क्रांतिदिनी ०९ ऑगस्ट २०२० ला कार्यालय सुरू होण्याचा आग्रह असतांनाही प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे.
     चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी परिस्थितीचे कर्तव्यपुरक अवलोकन करीत असून अद्यापही कार्यालय सुरू न झाल्याने जनतेत आक्रोश व प्रशासनावर असंतोष असतांना परिस्थिती सांभाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत आहेत परंतु चिमूर क्रांतिभूमीचा इतिहास स्वातंत्र पूर्व काळापासून अत्यंत रक्तरंजित व चिमूर जिल्ह्यासाठी दि.२० जाने.२००२ रोजीच्या सर्वपक्षीय आंदोलनात तहसील कार्यालय जळीत प्रकरणाची सर्वत्र पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
     जिल्हा प्रशासनाने चिमूर येथील उपविभागीय कार्यालयात चिमूर अप्पर जिल्हाधिकारी फक्त पाटी लावून अद्यापही कार्यालय सुरू नसल्याने लोकप्रतिनिधींची दिशाभूल सुरू आहे सदर दिरंगाईमुळे बिघडण्याची चिन्हे असून चिमूर अप्पर जिल्हाधिकारी यांच्याहस्ते गणराज्य दिन २६ जाने.२०२१ ला ध्वजारोहनाणे कार्यालय सुरू कारावे अशी मागणी असतांना कार्यारंभ न झाल्यास चिमूर वासीयांच्या जखमेवर मीठ चोळल्या जाण्याने बिघडणाऱ्या परिस्थितीस संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.
      प्रशासकीय अधिकारी नियुक्तीनंर पदभार स्वीकारण्यास विलंब व आद्यपही सुरू न झालेले चिमुर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय गणराज्य दिन २६ जानेवारी २०२१ रोजीच्या ध्वजारोनाने कार्य शुभारंभ न झाल्यास उद्धभवनाऱ्या परिस्थितीस प्रशासन सर्वस्वी दोषी राहील असे चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी मुख्य सचिव मंत्रालय यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.