Top News

गोंडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक पुरस्कार श्री शिवाजी महाविद्यालय राजुराच्या विशाल शेंडे ला जाहीर.

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- श्री, शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा जिल्हा चंद्रपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना पथकाचा स्वयंसेवक विशाल मनोहर शेंडे याला २०१९-२०२० यावर्षीचा विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक पुरस्कार जाहीर झाला आहे. राष्ट्रीय सेवा योजना मार्फत महाविद्यालयात होत असलेल्या प्रत्येक उपक्रमात, विशेष श्रमसंस्कार शिबीर, राज्यस्तरीय शिबीर, राष्ट्रीय एकता शिबीर तसेच जनजागृती कार्यक्रम, रॅली अशा विविध कार्यक्रमात सहभाग घेत विशाल रासेयो मार्फत आपल्या गावात म्हणजेच वरूर रोड इथे सुद्धा जनजागृतीपर विविध उपक्रम राबवित आहे. राष्ट्रीय सेवा योजनेमार्फत विविध क्षेत्रात जनजागृतीपर कार्यक्रम राबवित उत्कृष्ट कार्य करणाऱ्या रासेयो स्वयंसेवकांना राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो, त्याच धर्तीवर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील रासेयो कक्षाद्वारे विद्यापीठ स्तरावर विद्यापीठ स्तरीय उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक म्हणून पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यासाठी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत संपूर्ण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रस्ताव मागविण्यात आलेले होते, त्यातून विद्यापीठाचा उत्कृष्ट रासेयो स्वयंसेवक पुरस्कार विशाल मनोहर शेंडे याची निवड करण्यात आली. दिनांक १३ जानेवारी २०२१ रोजी  गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे मान्यवरांच्या हस्ते सकाळी ११.०० वाजता पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

      विशालची उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून निवड झाल्याबद्दल श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा चे प्राचार्य डॉ. एस. एम वारकड, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बल्की तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद, आई-वडील, सर्व स्वयंसेवक मित्र यांनी अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने