अन् फिर्यादीने पेढे वाटून आनंद साजरा केला.


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- तालुक्यातील माजरी पोलिस स्टेशनमध्ये आपली चोरीला गेलेली मोटर सायकल पोलिसांनी परत मिळवून दिल्याबद्दल पोलिसांना पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.
    
  निलेश चंदनखेडे असे पेढे वाटणा-या इसमाचे नाव आहे. त्यांची मोटरसायकल क्र. एम.एच.३४, बी.एम.६०५९ अज्ञात इसमाने चोरुन नेली होती.याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करुन तपास केला असता आरोपीकडून सदर मोटर सायकल हस्तगत करुन चंदनखेडे यांना परत करण्यात आली.त्यामुळे पोलिसांना पेढे वाटून त्यांनी आनंद साजरा केला.तसेच यावेळी चोरीला गेलेले टी.व्ही. आणि होम थिएटरही त्या-त्या फिर्यादींना परत करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या