कारवा/बल्लारशाह सफारी पर्यटन सुरु!

Bhairav Diwase
26 जानेवारी 2021 पासुन सुरु होणार.

संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे माध्यमातून प्रादेशिक वनक्षेत्रातील देशातील पहीले सफारी पर्यटन.
Bhairav Diwase. Jan 23, 2021
बल्लारपुर:- चंद्रपुर वनवृत्तातील मध्यचांदा वनविभाग अंतर्गत वनपरिक्षेत्र बल्लारशाह, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे माध्यमातून संपूर्ण आदिवासी वस्तीचे असलेले कारवा गावालगत असलेल्या मध्य चांदा वनविभागाच्या वनक्षेत्रात ग्रामिणांच्या सक्रिय लोकसहभागातून वन-वन्यजिव व्यवस्थापन करणे, मानव व वन्यजिव यांच्यात सहजिवन प्रस्तापित होऊन व वनाचे शाश्वत जतन करुन लोकांचे वनावरील अवलंबात्व कमी करुन वनाचे माध्यमातुन ग्रामीणांना रोजगार उपलब्ध करण्याचे दृष्टीकोनातुन संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे ठरावाव्दारे कारवा येथे जुने बैलगाडी रस्ते व कुप रस्ते यांचा वापर करुन 30 कि. मी. चे पर्यटनासाठी कच्चे रस्ते उपलब्ध आहे. 


या क्षेत्रात वाघ, बिबट रानगवे, अस्वल, रानमांजर, हरीन, चितळ, सांबर, नीलगाय, चौसिंगा, सायाळ, रानकुत्रे, मुंगुस, मसण्याउड, सायाळ, रानडुक्कर, रानगवे, हे प्राणी व विविध प्रकारची झाडे, 200 प्रकारचे पक्षी व विविधरंगी फुल पाखरे यांचा समावेश आहे. असे निसर्गदर्शन पर्यटकांसाठी वनाविषयी व वन्यजिव विषयी प्रेम निर्माण करण्यास तसेच वनाचे लोकसहभागातुन व्यवस्थापन करणे अत्यंत महत्वाचे ठरेल.

पर्यटन प्रवेशद्वार कारवा रोपवाटीका.....

1) नागपूर ते कारवा 170 कि.मी.
2) 2) चंद्रपुर ते कारवा 19 कि. मी.
3) 3) बल्लारपुर ते कारवा 6 कि. मी.

सदरचे क्षेत्रात 30 कि.मी. कच्चे रस्ते उपलब्ध असुन सदरचे पर्यटन संयुक्त वनव्यवस्थापन समिती, कारवा यांचे मार्फत वनव्यवस्थापन करण्यात येणार असुन सदर समिती संस्था (नोंदणी) अधिनियम, 1860 अन्वये नोंदणी क्रमांक 447 दिनांक 06/12/2004 अन्वये नोंदणीकृत आहे.

सदरचे वनपर्यटन 26 जानेवारी 2021 पासुन सुरु होत असुन सुरुवातील प्रायोगीक तत्वावर खाजगी वाहन यांना प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच भविष्यात नोंदणीकृत वाहन यांना प्रवेश देण्यात येईल.

सदर क्षेत्राचे प्रवेश शुल्क 500 रुपये आणि गाईड शुल्क 350 रुपये असणार आहे. प्रति दिन सकाळी 6:00 ते 10:00 वाजता, 4 वाहन आणि दुपारी 14:00 ते 16:00 वाजता, 4 वाहन यांना प्रवेश देण्यात येणार आहे. स्थानिक गाईड यांना प्रशिक्षण देण्याचे भविष्यात सदर पर्यटन ऑनलाईन बुकींगसाठी कार्यवाही सुरु आहे. Www.mytadoba.org या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहे.

सदरचा मार्ग बल्लारशाह वनक्षेत्रातील कक्ष क्र. 500, 495, 496, 497, 498, 513, 515, 511, 510, 509, 499 मार्गी परत कारवा रोपवाटीका पर्यंत पसरलेला आहे. सदरच्या परिसरात मोठ्या प्रमाणात ई-सर्विलस चे कॅमेरे लावलेले असुन त्याव्दारे पर्यटन देखरेख व नियत्रंण करण्यात येणार आहे. भविष्यात स्थानिक लोकांना रोजगार देण्याच्या उद्देशाने पर्यटन आणि वन व वन्यजीव व्यवस्थापन याबाबत संयुक्त व्यवस्थापन समिती, कारवा (JFM) यांचा निर्णय व्यवस्थापनाचे दृष्टीने घेण्यात येईल. अशी माहिती समितीचे अध्यक्ष श्री विनोद सिडाम यांनी सांगितली आहे, पर्यटना संबंधी अधिक माहितीसाठी श्री संतोष थिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह (9922450585) यांचेशी संपर्क साधावा.