ब्रम्हपुरी:- तालुक्यातील बरडकिन्ही येथील युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृतक युवकाचे नाव भोजराज गोपाल पाकडे वय वर्षे 31 असे असून टा.बरडकिन्ही येथील रहिवासी आहे.
सविस्तर वृत्तांत याप्रमाणे आहे की, दि 26/01/2021 ला रात्रौ 9:00 ते 10:00 च्या सुमारास भोजराज ने घरी कुणी नसल्याचा फायदा घेत स्वत:च्याच घरी गळफास घेऊन आत्महत्या करून जिवनयात्रा संपविली. भोजराज पच्छात्य कुटुंबात आई, बाबा पत्नी एकूण चार जण आहेत. आत्महत्या करण्याचे कारण अध्यापही कळू शकले नसून घटनेचा पुढील तपास संबंधित पोलीस विभाग करीत आहे.