Top News

फिरण्यासाठी नवं ठिकाणं!

पाचशे रुपयात व्याघ्र सफारी....
Bhairav Diwase. Jan 24, 2021
चंद्रपूर:- नेहमीच्या व्यापातून वेळ काढून भटकंती करण्याची प्रत्येकाच्याच मनात अधूनमधून घरं करत असते. भटकंती वेड असणाऱ्यासाठी कमी पैशात व्याघ्र सफारी घडवून आणणारा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मध्य चांदा वन विभागांतर्गत बल्लारपूर वन परिक्षेत्रातील कारवा संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून कारवाच्या जंगलात गणतंत्र दिन २६ जानेवारी पासून व्याघ्र सफारीला सुरूवात होत आहे.
  
प्रादेशिक वनक्षेत्रात अवघ्या ५०० रूपयात व्याघ्र सफारीचा हा देशातील पहिला उपक्रम आहे. स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी लोकसहभागातून सदर पर्यटन राबविण्यात येत आहे. 
  
या सफारीसाठी ३० कि.मी चा कच्चा रस्ता आहे. या व्याघ्र सफारीत पर्यटकांना ७ वाघ, बिबट, रानगवे, अस्वल, रानमांजर, हरीण, चितळ, सांबंर निलगाय, चौसिंगा, सायाळ, रानकुत्रे, मुंगुस यासह २०० प्रकारचे पक्षी पर्यटकांना अनुभवता येणार आहे.
   
   मध्य चांदा वनविभागातंर्गत येत असलेल्या बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील कारवा संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून लोकसहभागातून वन- वन्यजीव व्यवस्थापन करणे, मानव व वन्यजीव यांच्यात सहजीवन प्रस्तापित होवून वनाचे शाश्वत जतन करून लोकांचे वनावरील अवलंबत्व कमी करून वनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संयुक्त वन व्यवस्थापन समितीने ठराव घेवून पर्यटनाचा निर्णय घेतला आहे.
 
    या ठरावात वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून जुने बैलगाडी रस्ते, कुप रस्ते यांचा वापर करून ३० कि.मी चा पर्यटनासाठी कच्चा रस्ता उपलब्ध आहे. 
     
कारवा पर्यटन प्रवेशव्दारावर रोपवाटिका आहे. प्रायोगिक तत्वावर ५०० रूपये शुल्क आकारून खाजगी वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच ३५० रूपये गाईडचे द्यावे लागणार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने