Top News

पोंभुर्णा तालुक्यातील ४ युवक देशसेवेसाठी सज्ज.

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. राहुलभाऊ संतोषवार यांनी प्रत्यक्ष भेटून युवकांचा केला सत्कार.

श्री. राहुलभाऊ संतोषवार यांचा वाढदिवस भाजपा कार्यकर्त्यांनी केला साजरा.

Bhairav Diwase. Jan 26, 2021

पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील 4 युवक देशसेवेसाठी सज्ज झाले आहेत. कसरगठ्ठा येथील मुकेश कोसरे BSF, डोंगरहळदी येथील अंकुश बुरांडे BSF, सातारा तुकुम प्रमोद भुरसे BSF, आंबेधानोरा येथील रंजित पेंदोंर CISF या सर्व विद्यार्थ्यांचे केंद्रीय पोलीस दल भरतीमध्ये निवड करण्यात आली आहे. 

     प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली केमारा-देवाडा जिल्हा परिषद सदस्य श्री. राहुल भाऊ संतोषवार यांच्या हस्ते प्रत्यक्ष युवकांना भेटून शाल, श्रीफळ, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुक्यातील भाजपा व भाजयुमो कार्यकर्ते उपस्थित होते.

केमारा-देवाडा जिल्हा परिषद क्षेत्राचे लोकप्रिय सदस्य सन्माननीय श्री. राहुलभाऊ संतोषवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा........



केमारा-देवाडा जिल्हा परिषद क्षेत्राचे लोकप्रिय सदस्य सन्माननीय श्री. राहुलभाऊ संतोषवार यांचा आज वाढदिवस केक कापून सर्वत्र साजरा करण्यात आला. 

श्री. राहुलभाऊ संतोषवार यांनी केमारा-देवाडा जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये अनेक विकासाभिमुख जनकल्याणकारी कामे केलेली आहेत. त्यामुळे त्यांची एक समाजकार्याची छबी जनसामान्य माणसापर्यंत उमटलेली आहे. जनसामान्य जनतेची सेवा त्यांनी निरंतर ठेवलेली असून कोरोना काळात वृद्ध निराधार अपंगांना जीवनावश्यक किटचे वाटप, वृद्धाना वाकिंग स्टिकची काळी, गरजू कुटुंबाना ब्लॅंकेटक चे वितरण, वृक्षारोपण, आरोग्य सुदृढ असावे याकरिता केशरयुक्त दुध बिस्किट चे वाटप करण्यात आले.





     आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली राहुलभाऊ संतोषवार यांनी केमारा, भटारी, चेक आष्टा, थेरगाव इत्यादी ठिकाणी १४० कुटुंबाना बिरसा मुंडा घरकुल योजनेचा लाभ मिळवुन दिलेला आहे. गंगापूर नवीन येथील शेतकऱ्यांची असलेली तलावाच्या बांधकामाची समस्या मार्गी लावण्यात आली. गावातील रस्त्याचे बांधकाम करिता जिल्हानिधी व इतर निधी अंतर्गत सिमेंट काँक्रेट रोड, नाली बांधकाम, गावातील चौकात नागरिकांना बसण्याकरिता गावामध्ये बेंचेस व्यवस्था करण्यात आली. राहुलभाऊ संतोषवार यांनी लच्छमपूर येथील पिण्याच्या पाण्याची समस्या तात्काळ मार्गी लावली. तसेच काही गावामध्ये पाण्याची समस्या दूर व्हावी या करीता त्यांनी गावामध्ये बोअरवेल मारण्यात आले. सी.डी. वर्कचे काम, सभागृहाचे काम, गावातील मुख्य चौक सौंदर्यकारणाचे काम, शाळा बांधकाम, अंगणवाडी करिता किचनशेड चे बांधकाम इत्यादी कामे राहुलभाऊ संतोषवार यांनी आपल्या जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये केलेली असल्याने त्यांचा आज वाढदिवस भारतीय जनता पार्टी च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्वत्र केक कापून साजरा केला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने