क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मुळेच स्त्रिया समाजाच्या मुख्य प्रवाहात, घुग्गुस प्रयास सखी मंच अध्यक्ष्या सौ. किरणताई बोढे यांचे प्रतिपादन.
चंद्रपूर:- घुग्गुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस द्विप प्रज्वलीत करून व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरवात माजी ग्रामपंचायत सदस्या कुसुमताई सातपुते यांच्या हस्ते करण्यात आली.
प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुछ देऊन करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून घुग्गुस प्रयास सखी मंच अध्यक्ष्या सौ. किरणताई बोढे, माजी ग्रामपंचायत सदस्या कुसुमताई सातपुते, माजी ग्रामपंचायत सदस्या पूजताई दुर्गम, माजी ग्रामपंचायत सदस्या सुचिताताई लुटे, रिताताई काळे, कीर्तीताई पडवेकर, कांचनताई चंदेल, प्रतिभाताई बहादे उपस्थित होत्या.
यावेळी मनोगत व्यक्त करताना घुग्गुस प्यास सखी मंच अध्यक्ष्या सौ.किरणताई बोढे म्हणाल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या मुळेच स्त्रिया समाजाच्या मुख्य प्रवाहात आज आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्हातील नायगाव येथे झाला. सावित्रीबाई या शिक्षिका, कवियित्री व समाजसुधारक होत्या भारतात पहिली महिला शिक्षणा साठी शाळा सुरु केली. त्यांनी स्त्री व शुद्रामध्ये शिक्षणाचा प्रसार केला म्हणून थोर समाजसुधारक शिक्षणतज्ञ सावित्रीबाई फुले यांचा 3 जानेवारी 2021 जन्मदिवस राज्यातील शाळा, महाविद्यालय, शासकीय व निमशासकीय कार्यालयात महिला शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याच्या निर्णय घेतला आहे असे त्या म्हणाल्या.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन संचालिका सुनंदा लिहीतकर यांनी केले तर आभार शीतल कामातवार यांनी मानले. कार्यक्रमास निशा उरकुडे, पुष्पाताई रामटेके, वैशाली शंभरकर, छाया पाटील, प्रीती धोटे, अर्चना लेंडे, वंदना मुळेवार व मोठया संख्येत महिला उपस्थित होत्या.
कार्यक्रमच्या यशस्वीते करिता गौरव ठाकरे, प्रिया नागभीडकर मोहनीश हिकरे, उमेश दडमल व सोनू बहादे यांनी प्रयत्न केले.