स्थानिक चिंतामणी महाविद्यालय, चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स, चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स व चिंतामणी कनिष्ठ महाविद्यालय तर्फे मोठ्या उत्साहात "प्रजासत्ताक दिन" साजरा.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Jan 26, 2021
पोंभुर्णा:- स्थानिक चिंतामणी महाविद्यालय, चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स, चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स व चिंतामणी कनिष्ठ महाविद्यालय पोंभुर्णा तर्फे मोठ्या उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी कॉलेजच्या प्राचार्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्राचार्य डॉ. सुधीर हुंगे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, दर वर्षी जानेवारी महिन्याच्या २६ तारखेला भारताचा ‘प्रजासत्ताक दिन’ साजरा केला जातो. आपला भारत १५ ऑगष्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. पण त्याची लोकशाही राज्य घटना २६ जानेवारी १९५० रोजी अमलात आली. म्हणून हा ‘प्रजासत्ताक दिन म्हणून मानला जातो. आमचा भारत हे एक मोठे लोकशाही राज्य आहे म्हणजे हे लोकांचे, लोकांनी,लोकांसाठी चालविलेले राज्य आहे. हा अधिकार भारताच्या घटनेनुसार २६ जानेवारी १९५० साली मिळाला. त्यादिवसापासून प्रजेची सत्ता सुरु झाली.


त्यानंतर प्राचार्य डॉ. टि. एफ. गुल्हाने सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताची राज्यघटना संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी अंमलात आली. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिवस म्हणून दरवर्षी साजरा केला जाणारा राष्ट्रीय दिन आहे.


तसेच प्राचार्य डॉ. एन. एच पठाण सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हटले की, या दिवशी संपूर्ण देशभर आनंदाचे व उत्साहाचे वातावरण दिसून येते. पण निव्वळ उत्साहात दिवस साजरा केल्याने आपली जबाबदारी संपत नाही. खरे तर हा प्रतीज्ञेचा दिवस! लोकशाहीच्या उदघोषाचा दिवस! प्रत्येक भारतीयाने या महत्वाच्या दिवशी देशासाठी देशहितकारक कार्य करण्याची प्रतिज्ञा केलीच पाहिजे, आणि त्यानुसार वागले पाहिजे. असे राष्ट्रीय दिन साजरे केल्या मुळे प्रत्येकाच्या मनातील राष्ट्रीय भावना राष्ट्र प्रेम अधिक उसळून, उजळून निघते.

यावेळी कार्यक्रमाला चिंतामणी महाविद्यालय, चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स, चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स व चिंतामणी कनिष्ठ महाविद्यालय पोंभुर्णाचे प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.