(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा स्थानिक चिंतामणी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, गोंडपिपरी येथे महाविद्यालयीन युवा महोत्त्सव अंकुर २०२१ चे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी हा सोहळा तीन दिवस चालत असे परंतु कोरोना रोगाच्या प्रादुर्भाव लक्षात घेता हा सोहळा यावर्षी आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आला.
या युवा महोत्सव करीता स्पर्धेची पाच भागात विभागणी करण्यात आली होती. गणतंत्रदिन प्रश्न मंजुषा, कला, साहित्य, नृत्य आणि व्होकल फॉर लोकल अशी स्पर्धेची प्राथमिक विभागणी करण्यात आली होती.
गणतंत्र दिन प्रश्न मंजुषा मध्ये कू. सीमा फरकडे ही विद्यार्थिनी विजेती ठरली. कला विभागात एकूण सहा उपविभाग होते, त्या मध्ये प्रामुख्याने पुष्प रचना, केशभूषा रचना, थाळी सजावट, रांगोळी स्पर्धा, देशभक्तीपर चित्रकला स्पर्धा, आणि फोटोग्राफी असे उपविभाग होते. यात पुष्प रचना स्पर्धेत श्रुतिका ठेंगणे ही विजेती ठरली, केशभूषा रचना स्पर्धेत साक्षी कावळे ही विजेता झाली, थाळी सजावट स्पर्धेत दीक्षा कुरवतकर ही विजेती झाली, रांगोळी स्पर्धेत निकिता बोमकंतीवार, चित्रकला स्पर्धेत वैष्णवी बांगरे, कल्याणी मादुरवार ह्या विजेत्या ठरल्या तर फोटोग्राफी मध्ये ऋतिक तावडे हा विजेता ठरला.
साहित्य या विभागात दोन उपविभाग होते, देशभक्तीपर कविता वाचन आणि देशभक्तीपर वक्तृत्व स्पर्धा, यात कविता वाचन स्पर्धेत पृथ्वी झाडे, स्नेहा गोविंद वार, तर वक्तृत्व स्पर्धेत निकिता बोंकांतीवार आणि ऋतिक तावडे हे विजेते ठरले.
एकल नृत्य स्पर्धेत कू. सायली कावळे हिने बाजी मारली, व्होक ल फॉर लोकल स्पर्धेत, स्वयं हस्तकला हा एक उपविभाग होता ज्यात वैष्णवी बांगरें हिने प्रथम क्रमांक पटकाविला. त्याच प्रमाणे या महोत्सवास खास बाहेरील अतिथी स्पर्धकांचे सुद्धा योगदान लाभले. या मध्ये सौ. पौर्णिमा जोशी यांनी आपल्या सुंदर अशा देशभक्तीपर गायन कलेची प्रतिभा दाखवून सर्वांना मंत्रमुग्ध केले. पाठक भगिनी, दक्षिण कोरबा, छत्तीसगड, यांनी हार्मोनियम आणि गायन कलेचा तर अनुराग स्वामी, वरोरा यांनी तबला वादन कलेचा अदभुत नमुना सादर केला. या प्रस्तुत महोत्सवासाठी संपूर्ण महाविद्यालयीन सदस्य तथा विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले. ही स्पर्धा आभासी पद्धतीने आयोजित करण्यात आली होती म्हणून याचे समालोचन, सादरीकरण स्पर्धेची संयोजिका, प्राध्यापिका पूनम चंदेल यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. आशिष चव्हाण यांनी केले. या स्पर्धेसाठी विद्यार्थी एकीकरण, समायोजन, सुसूत्रता आणि तांत्रिक बाबी प्रा. प्रतिक बेझलवर, प्रा. संजय कुमार, प्रा. नलिनी जोशी, प्रा. अविनाश चकीना र पुवार, प्रा. उमेश वारघने यांनी सांभाळल्या.