आरटीओच्या ४० हजार रूपयांच्या लाच प्रकरणात अशोक मत्तेला अटक!
चंद्रपूर:- आरटीओ कार्यालयात लाच मागितल्याप्रकरणी चंद्रपूर येथील अशोक मते याला रामनगर पोलिसांनी अटक केली आहेे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 25 जानेवारी रोजी अशोक मते यांनी चंद्रपूरच्या आरटीओ कार्यालयात४० हजारांची लाच मागितल्याची तक्रार आहे. आरटीओ यांचे तक्रारीवरून याप्रकरणी रामनगर पोलिसांनी अशोक मते यांच्यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे.
आरटीओ कार्यातील वाहन निरीक्षक जिल्लेवार यांना अशोक मते यांनी मला दरमहा पैसे हवे आहेत, अशी मागणी केली. न दिल्यास तुमची खातेनिहाय चौकशी लावू अशी धमकी दिली. ही बाब जिलेवार यांनी, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांना सांगितली. पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी कोठारीचे पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक चव्हाण यांचे नेतृत्वात एक चमू गठीत करून सापळा रचला. या सापळ्यात अशोक मते जिल्हा स्टेडियमजवळ ४० हजारांची खंडणी घेताना रंगेहात सापडला.
अशोक मते हा काँग्रेसचा जुना कार्यकर्ता असून सध्या तो आमदार, खासदार च्या नावाने अवैध वसुली, अवैध दारू विक्री यात सहभागी असल्याची माहिती आहे. आपले राजकीय पाठबळ दाखवण्यासाठी तो नेहमी मोठे बॅनर लावत असल्याचीही माहिती आहे.
अशोक मते यांनी हि लाच आमदारांचे नावाने मागितले असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
हा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून एका स्थानिक आमदारांनी पोलिसांवर दबाव आणल्याची चर्चाही चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात आहे.